१. वनसंपदा :
गावरान एकून १४५ हेक्टर आहे. त्यामध्ये ३६.८४ इतके वन आहे
गावामध्ये मुख्य पीक भात, उस, भूइमुग सोयाबीन गहू ही पीके आहेत.
२. जलस्त्रोत :
गावामध्ये लोकाना पीण्यासाठी वीहीरीवरुन पाणी पुरवठा होतो.
गावामध्ये नळ पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या मोठया दोन टाक्या आहेत टाकीची मर्यादा १ लाख्ा लीटर व ६५ हजार लीटर आहे. नळ पाणी पुरवठा चावी कनेक्श्ान ४५१ आहेत.
गावचा पाणी पुरवठा व्यवस्िथ्ात होतो़, गावात स्वच्छता रहावी साडपाण्याची निरगत व्हावी यासाठी गावात गटरसची आवश्यकता आहे.
३. फिरंगोजी शिदे याचा इतीहास :
अखील हिंदुस्थानभर १८५७ साली जो इंग्रज सत्तेवीरुध्द युध्दाचा भडका उडाला त्याचे लोण्ा कोल्हापूरापर्यंत कसे पोहचले हे समजण्यासाठी करवीरची एतीहासीक पार्श्वभुमी ध्यानी घेणे आवश्यक आहे.
औरंगजेबाच्या प्रचंड सेनासामथाशी झुंज देवून महाराणी ताराबाईच्या नेतृत्वाखाली मराठयांनी आपल्या स्वातंत्रयाचे रक्ष्ाण्ा केले. श्री ताराबाई यांनी पन्हाळा येथे इ स १७०८ मध्ये कोल्हापूरची स्वतंत्र गादी स्थापन केली.
इ स १७३० मध्ये सुप्रसिध्द वारणेचा तह होवून सातारकर छत्रपती कोल्हापूरपासनू विभक्त झाले. १७४९ मध्ये शाहू महाराज सातार्यास निध्ान पावले. व त्याची सत्ता पेश्ाव्यांकडे जावून अखेरीस पेश्ावे व सातारकर या उभयतां इंग्रजी राजसत्तेने अनुक्रमे इ स १८१८ व १८४८ साली नामशेष्ा केले.
परंतू पानीपतच्य लढाइनंतर इ स १७६६ मध्ये कोल्हापूरच्या दुसर्या संभाजीची राणी जीजीबाई यांनी इंग्रजाशी प्रथम तह केला. तेव्हा कोल्हापूरच्या रक्ष्ाणाची जबाबदारी इंग्रजावर पडली. तेथून संभाजी राजेंचे दत्तक पुत्र शिवाजी महाराज याची दीघ्ाकाळ राजवट इ स १८१२ पयंत झाली. या कारकीदीत अनेक घ्ाडामोडी झाल्या. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे वडील संभाजी उर्फ आबासाहेब हे गादीवर बसले. त्यांची कारकीद सुखावह शिस्तबध्द होण्याचा रंग दिसत होता. यांनी इंग्रजाशी दोस्तीचा तह केला होता. परंतु सयाजी मोहीते नावाच्या सरदाराने आपली जमीन काढून घेतली या कारणवरुन भर दिवसा राजवाडयात शिरुन त्याचा १६.०७.१८२१ रोजी वध्ा केला.
त्यानंतर त्यांचे सावत्र भाऊ श्ाहाजी उर्फ बुवासाहेब महाराज गादीवर बसले. त्यांची कारकीद धामुधुमीची गेली. यानी सुध्दा इंग्रजाचे जोख्ाड झुगारुन देण्यचा प्रयत्न केला. पण्ा त्यात त्यांना यश्ा आले नाही. त्यांना २६ डिसेंबर १८३० रोजी सौ. आनंदीबाइंचे पोटी पुत्र झाला. त्याचे नाव शिवाजी उर्फ बाबासाहेब असे ठेवले. पुढे दुस-या राणी सौ. नर्मदाबाइसाहेब यांना ८ जानेवारी १८३१ रोजी दुसरा पुत्र झाला त्याचे नाव शाहू असे ठेवले.
याप्रमाणे महाराजाना पुत्रलाभ होवून परम संतोष्ा झाला. पुत्र जन्माचे सोहाळे झाले. कुलस्वामीनी तुळजाभवानी इचा नवस फेडणेसाठी तयारी करुन सर्व लवाजमा सिध्द केला. परंतु हे रहित झाले. पुढे २५ जुलै १८३८ मध्ये आनंदीबाइ साहेबांना पुत्र झाला. त्याचे नाव राजाराम ठेवले. तेव्हा महाराज लवाजम्यासह तुळजापूरला निघाले. परंतु वाटेत ज्वराश्ा होवून ता २९ नोव्हेंबर १८३८ रोजी ते कैलासवासी झाले.
श्ाहाजी राजे उर्फ बुवासाहेब याच्या अंगी ख्ा-या मराठयाची लक्ष्ाणे होती. ते शुर असून सरदारी बाण त्याच्या अंगी होता. परंतु तो प्रकट होण्यास त्या काळात अवसर मिळाला नाही. ते मोठे उदार होते. देण्ाग्या द्याव्यात तर बुवासाहेबांनी अशी त्यांची कीती लोक अद्याप गातात.
बुवासाहेबांच्या निधनाच्यावेळी राजघ्ाराण्यात त्याच्या आनंदीबाई, सकवारबाई, सगुणाबाई, उमाबाई व कमळजाबाई अशा ५ राण्या होत्या. आनंदीबाई ३३ वर्षाच्या असून त्यांना ताराबाई उर्फ मासाहेब म्हण्ात. त्याना शिवाजी उर्फ बाबासाहेब वय ८ वर्ष्ा, आउसाहेब वय ५ वर्ष्ा, बाळाबाई वय २ वर्ष्ा, राजाराम वय ५ महिने अशी चार अपत्ये होती. आणी चिमासाहेब वय ७ हा मागे सागितल्याप्रमाणे नर्मदाबाई साहेबापासून झालेला आण्ाखी एक मुलगा होता. बाळंतपणातच नर्मदाबाइ वारल्या हेच चिमासाहेब कोल्हापूरच्या स्वातंत्रय युध्दातील नायक (१८५७) होत.
आनंदीबाइ उफ तारा आइसाहेब हीच मुख्य राणी होती. व तिचा वडील पुत्र शिवाजी उर्फ बाबासाहेब यांचे नावे राज्यकारभार सुरु होता. भारताची स्वातंत्रय देवता, महाराणी लक्ष्मीबाई, श्रीमंत नानासाहेब पेश्ावे, सेनापती तात्या टोपे, दिल्लीचे बादहशा त्यांची बेगम झिन्नतमह, अयोध्येची बेगम व कुंवरसिग यांनी हिदुस्तानातून जुलमी व अन्यायी,परकीय इंग्लीश्ा राजसत्तेचा नाश्ा करण्याची प्रतीज्ञा केली आणि अत्यंत गुप्तपणे आखील भारतात उठावणी करण्याचे ठरविले. परंतु १० मे १८५७ या दिवशी मीरत येथे १० व्या फलटणीतील शिपायानी बंडाचा झेंडा उभारला. स्वातंत्रयाची ज्योत पेटली गेली. स्वातंत्रय वीराच्या आरंभीच्या रण्ाधुमाळीने उत्तर हिदुस्तान भ्ाडकला. अवघ्या दोन महीन्यात या क्रातीयुध्दाचे प्रचंड झंझावाती रण्ाकंदन झाले.
आरंभी स्वातंत्रय वीराच्या रण्ागजना कोल्हापूरपर्यंत येवून कोल्हापूर श्ाहरात ३१ जुलै १८५७ चा भीष्ाण्ा रात्री हत्याकाड झाले. या युध्दात कोल्हापूरचा मोठा भाग आहे. परंतु या श्ाहरात ज्यांनी शौरय व पराक्रम गाजवीला ज्यानी ज्यानी पण अर्पन केले अनंत यातना सोसल्या त्या ज्ञात अज्ञात थोराच्या पराक्रमाच्या या लेखात परामष्ा घेण्यात आला आहे.
१८५५ मध्ये फलासीच्या लढाइने इंग्रजीसत्तेचा या देशात पाया घातला. व पुढे १८५६ पर्यंत काही वेळा लढून तर फितुरीने नव्या युध्द सामुग्रीच्या जोरावर भारतातील अत्यंत समृध्द पेदश्ा इस्ट इंडीया कंपनी सरकारने गिळंकृत केली. व राहीलेला भारत रक्ताचा बिदूही न साडता केवळ औरस संकृती नाही म्हणून लेख्ाणीच्या फटकायाने खालसा करुन आखील हिंदुस्तानास ब्रिटीश्ा सत्तेचा तांबडा रंग फासण्याचा लाड डलहौसीने चंग बांध्ाला. अर्ज, विनंत्या विनवण्या इंग्लीश्ा अधिकारी याचे अभिपाय धुडकावून ज्यानी कंपनीसरकारास हिदुस्तानातील पदेश्ा जिंकण्यास सहाय केले अशा संस्थानीकाची राज्ये अन्यायाने व कृतघ्नपणे खालसा केली.
इंग्रजाची नवी करडी शिस्त, इंग्रजी शिक्ष्ाणाची सुरवात, आगगाडी, तारायंत्रे, पोष्ट, नवे रस्ते वगैरे यात्रीक सुधारणा केल्या. तसेच गाइची व डुकराची चरबी लावलेली काडतुसे दातानी तोडण्यासाठी केलेली सक्ती ही कारणे होतीच पण्ा ख्ारं कारण्ा हे होते की, व्यापारी पेशाने आलेले हे मुठभर लोक आपले स्वातंत्रय हरण्ा करुन या देशात अधिराजे होणार या करता त्यांना हाकलून आपला देश्ा स्वातंत्र केला पाहिजे ही स्वातंत्रयाची तळमळ होय. या सर्वाच्या एक समयावच्छदेकरुन महान स्फोट होवून वरील प्रमाणे देशी फलटणी इंग्रजावर बिथ्ारल्या त्याचे लोण्ा कोल्हापुरापर्यंत कसे आले हे समजण्यास उत्तर हिंदुस्तानात ३१ जुलै १८५७ पर्यंत स्वातंत्रसेनेस कसे विजय होत गेले ते पहाणे जरुरीचे आहे.
४. इ स १८५७ :
१९ फेब्रुवारी १८५७ बरहामपुर १९ ची फलटणीचा दंगा
२९ माच मंगल पांडेची उठावणी
२८ एप्रिल मंगल पांडे फाशी
१० मे मीरत येथे क्रांती युध्दाची सुरवात
१२ मे क्रांतीकारकांनी १ दिवसात दिल्ली जिंकली
२९ मे नानासाहेब पेश्ावे कानपुरात दाख्ाल
२३ ते ३१ मे बनारस अलाहाबाद, लख्ानौ येथे उठावणी
४ ते १४ जुन झांशी येथे श्री लक्ष्मीबाई राणीची उठावणी व
अयोध्या, रोहिल खंड, कानपूर, फौजेची उठावणी.
काल्पीवर क्रांतीसेनेस जय
७ जुन इंग्रजी फौज दिल्लीत दाख्ाल
१४ जुन ग्वाल्हेरच्या फौजा बिथ्ारल्या
२० जून रंगो बापूजीच्या मुलांस (सितारामास) कैद (कोल्हापूरात पकडले)
२६ जुन कानपुरात व्हीलरची श्ारणागति
२७ जुन कानपुर घाटावर इंग्रजांची कत्तल
१ जुलै बिठूर येथे नानासाहेबास राज्याभिषेक
५ जुलै रंगो बापूजी कायमचा फरारी
१६ जुलै कानपुरात बीवी घ्ारात इंग्रजाची कत्तल
१७ जुलै कानपूर इंग्रजांनी विकले
१७ जुलै नानासाहेब बिठूर सोडतात
२७ जुलै तात्या टोपे पुन्हा कानपूर जिंकतो
२७ जुलै आरा (बिहार) येथे कुंवरसिंहाची उठावणी
३० जुलै लाहोर येथे धामधूम
३१ जुलै कोल्हापूर येथे २७ वी फलटण्ा बंड करुन उठली
यात ३१ जुलै रोजी कोल्हापुरात उठावणी का व कशी झाली हे आता पाहू. वरील घ्ाटना पाहिल्यास क्रातीकारकाना ३१ जुलैपयंत विजयश्री माळ चालत होती व त्या विजयाच्या उत्साह जनक वातार् दक्षीणेत कोल्हापुरात येत होत्या येथील गुप्त संघ्ाटना विशिष्ट दिवसाची व इशात्याची वाट पहात होत्या.
५. डिसेंबरचा राजवाडयातील पसंग :
चार डिसेंबर १८५७ या तारखेच्या रात्री रेसिडेन्सीत साहेबांस अशी गुप्त बंदी मिळाली की कोल्हापूरापासून ८ मैलावरील गिरगाव गावात क्रातीकारकांची मोठी सेना तयार असून ती पुन्हा हल्ला करणार आहे. तेंव्हा इंग्रजांनी त्यास तोंड देण्याची तयारी केली. पण्ा त्या रात्री काही घ्ाडले नाही. तथापि त्या रात्री पहारेवाल्यांना न जुमानता क्रातीकारकानी इकडे राजवाडयात शिडया लावून प्रवेश्ा केला.
या क्रातीकारकाना जरु ते अन्न, वस्त्र व इतर सहाय कोल्हापूराहून मिळत होते. त्यांनी आसपासच्या जंगलाचा आश्रय केला होता. त्याचा नेता गिरगावचा फिरंगोजी शिंदे म्हणुन एक ज्वलंत लहाल वीरामणी होता. त्याच्या हुकमाने हजारो लोक लढावयास तयार झाले होते. श्ास्त्रे दारुगोळा तयार होता. ३१ जुलै १८५७ च्या क्रांतीत राजवाडयाचा आश्रय मिळाला नाही म्हणुन क्रातीवरांनी आपला यावेळेचा उठावणीचा बेत बदलून प्रथम राजवाडयाचाच कब्जा घ्यावयाचा व तेथून रेसिडेन्सीवर हल्ला करावयाचा असा मनसुबा आख्ाला होता.
राजवाडा हा मोठा असून त्यांच्या भोवती तटासारख्या भिंती होत्या. नुकताच बांध्ालेला नगारखाना हा ही तटबंदीसारखाच होता.
म्हणुन प्रथम क्रांतीकारकांनी ता ४ डिसेंबर १८५७ रोजी मध्यरात्री जुन्या राजवाडयात शिडया लावून प्रवेश्ा केला. व फिरंगोजी शींदे आणि इतर लोकानी राजवाडयापुढे तोफा आणुन त्यात दारु भरण्यास सुरवात केली इतक्यात ख्ाजिन्याजवळ कोल्हापूर इंन्फटीचा पहारा होता. त्यातील एक शिपाइ (नाइक काशी उबारे) हा बाहेर आला व त्याने गोळी झाडली त्यामुळे क्रांतीकारकाचा पुढारी फिरंगोजी शींदे मरण्ा पावला.
परंतु विधिघ्ाटना निराळी होती क्रांतीकारकांच्या उठावणीची बातमी ता ४ रोजी रात्री २ वाजता रिसालदार रहिमानदास याने साहेबांना दिली. वदी मिळताच लाइन्समध्ये जाउन कनल लेकबने धोक्याचा बिगुल वाजवीला आणि कोल्हापूर श्ाहरावर (किल्यावर) अचानक हल्ला करण्याचे ठरविले. त्याने बरोबर युरोपीयन सैन्याची तुकडी व तोफखाना घेतला.
रेसिडेन्सीत फक्त मिसेस स्नायडर व मिसेस गुइरिंग या होत्या. इंग्रजी फलटणीने श्ानिवारी वेशीवर तोफा लावून वेस फोडली. व दरवाजे उघ्ाडले. [हल्ली शिवाजी चौक जेथे आहे तेथे ही वेस होती, थोरली मंडइ व शिवाजी पुतळा हे वेशीच्या बाहेर आहेत या वेशीस दिल्ली दरवाज म्हण्ातात] यथे ८ माण्ासे मारली गेली. त्यात क्रातीकारकांचा नाइक मरण्ा पावला.
याप्रमाणे झटापट होवुन जेकबने कब्जा घेतला. तुरुंगाकडे (हल्ली रवीवार वेशीत जो तुरुग आहे तो) क्रातीकारक जावून तेथील कैदी मुक्त करण्याच्या आत जेकबने तरुंगही ताब्यात घेतला.
रात्रीच्या मिळालेल्या बातमीचा उपयोग करुन जेकबने हा अचानक हल्ला केल्यामुळे, राजवाडा, नगारखाना आणि सर्व श्ाहर त्याच्या ताब्यात आले. क्रातीकारकानी जी कोडी केली त्यातच त्यांचा कोंडमारा झाला.
राजवाडा राजेश्रवयाने संपन्न होता. आत बाबासाहेब, चिमासाहेब, त्यांच्या राण्या व इतर राज घ्ाराण्यातील स्त्रीया, दास, दासी पहारेकरी वैगेरे होते. साहेबांना श्ानिवार वेशीने आत प्रवेश्ा होवून त्याना तुरंग मिळाला पण्ा राजवाडयात काय चालले होते याची त्याला कल्पनाही नव्हती व आत सैन्यासह प्रवेश करणे त्यांना तितकेच अवघ्ाड होते.
कॅप्टन स्नायडर पांढरे निशाण्ा घेवून आत जाण्यास तयार झाला. याच वेळेस जेकबने बिगुल वाजवून बाहेर असलेले आपले सैन्य श्ाहरात घेतले.
आत राजवाडयात जेथे जेथे छपरे व खिडक्यात उभा रहायला जागा असेल तेथे तेथे शेकडो सश्ास्त्र क्रातीवरी उभे होते. व राजवाडयाच्या चौकात एक प्रेत पडलेले होते. स्नायडरने आत जावून तीन अटी सागीतल्या
१. श्ास्त्रे खाली ठेवा
२. सांगू त्याप्रमाणे वागा
३. गुन्हेगाराखेरीज सर्वाना रक्ष्ाण्ा मिळेल. राजघ्ाराण्यातील मान सन्मान राख्ाल जाइल व त्यांचे सर्व प्रकारे रक्ष्ाण्ा केले जाइल असे करण्यात पुढील रक्तपात थाबावा हा हेतू आहे.
कॅ स्नायडर राजवाडयात अर्धा तास होता तो आत असेर्पयंत बाहेर भयानक शांतता होती. स्नायडर एक रख्ावालदार घेवून राजवाडयाच्या चौकात गेला. व त्याने महाराजांची भेट घेतली. आत इतके लोक का आले याबददल काही खुलासा करण्यात आला नाही. बाबासाहेब महाराजांनी अटी मान्य केल्या त्यांनी कॅ स्नायडरचे भेटीबददल आभार मानले.
यानंतर राजवाडयाच्या चौकात जेकब आला. श्ास्त्रे खाली करण्याचा हुकूम झाला. त्याप्रमाणे श्ास्त्रे खाली करण्यास सुरवात झाली. लोकांनी श्ास्त्रांचा ढीग पाडला. जिकडे तिकडे स्तब्ध्ाता पसरली मग गुन्हेगारांना एका बाजुला आणुन चौकशी केली. कोट मार्श्ाल सुरु झाले. कर्नल गयरिन हा त्या कोटाचा पेसिडंट होता. ३६ लोकांनी गुन्हा कबुल केला. त्यांना त्यांच्या शिक्षा ताबडतोब अमलात आणुन ४ जणास तोफेच्या तोंडी दिले. राजवाडयातील पागेच्या भितीलगत ३२ जणंना गोळया घालून ठार मारण्यात आले. याचे सुत्र चालक कोण्ा आहे हे कळणे मात्र त्यावेळी अश्ाक्य होते. चिमासाहेबांचा साहेबांना संश्ाय आला. कारण्ा थोरले महाराज बाबाहेब बोलत होते पण्ा चिमासाहेब गंभीर मुद्रा करुन स्वस्थ होते. ते एक अवाक्ष्ारही बोलले नाहीत. कनल जेकब लिहतात त्यावेळेस मला चिमासाहेब एक तेजस्वी व तडफदार मराठा तरुण्ा दिसला.
या नंतर चौकशीचे काम पुन्हा सुरु झाले. त्यामुध्ये आण्ाखी काही लोकाना फाशी, जन्मठेप अशा शिक्षा झाल्या अशा प्रकारे ३१ जुलै १८५७ ते ५ डिसेंबर १८५७ हा काळात झालेल्या उठावात एकून १०३ हुतात्म्यांनी स्वातत्रयदेवतेच्या स्थ्ाडीलात आहूती दिली. हे मृत्युचे भयानक तांडव चालू असताना एकही क्रांतीकारक डगमगला नाही. भीतीने आपल्या सहकाराच्या नावाचा गौप्य स्फोट करण्यास तयार झाला नाही. सवानी मृत्यूला मिठी मारली, ते अमर होवून धन्य झाले.