त्यानंतर त्यांचे सावत्र भाऊ श्ाहाजी उर्फ बुवासाहेब महाराज गादीवर बसले. त्यांची कारकीद धामुधुमीची गेली. यानी सुध्दा इंग्रजाचे जोख्ाड झुगारुन देण्यचा प्रयत्न केला. पण्ा त्यात त्यांना यश्ा आले नाही. त्यांना २६ डिसेंबर १८३० रोजी सौ. आनंदीबाइंचे पोटी पुत्र झाला. त्याचे नाव शिवाजी उर्फ बाबासाहेब असे ठेवले. पुढे दुस-या राणी सौ. नर्मदाबाइसाहेब यांना ८ जानेवारी १८३१ रोजी दुसरा पुत्र झाला त्याचे नाव शाहू असे ठेवले.
याप्रमाणे महाराजाना पुत्रलाभ होवून परम संतोष्ा झाला. पुत्र जन्माचे सोहाळे झाले. कुलस्वामीनी तुळजाभवानी इचा नवस फेडणेसाठी तयारी करुन सर्व लवाजमा सिध्द केला. परंतु हे रहित झाले. पुढे २५ जुलै १८३८ मध्ये आनंदीबाइ साहेबांना पुत्र झाला. त्याचे नाव राजाराम ठेवले. तेव्हा महाराज लवाजम्यासह तुळजापूरला निघाले. परंतु वाटेत ज्वराश्ा होवून ता २९ नोव्हेंबर १८३८ रोजी ते कैलासवासी झाले.
श्ाहाजी राजे उर्फ बुवासाहेब याच्या अंगी ख्ा-या मराठयाची लक्ष्ाणे होती. ते शुर असून सरदारी बाण त्याच्या अंगी होता. परंतु तो प्रकट होण्यास त्या काळात अवसर मिळाला नाही. ते मोठे उदार होते. देण्ाग्या द्याव्यात तर बुवासाहेबांनी अशी त्यांची कीती लोक अद्याप गातात.